ऑस्लो : भारत आणि पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच आहेत. शिक्षणामध्ये दोन्हीकडे काम करण्याची गरज असल्याचं नोबेल विजेत्या मलाला युसूफझईनं म्हटलंय.
झी मीडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मलालानं शिक्षण आणि बालहक्कांबाबत आपली मतं विस्तारानं मांडली. मलाला युसूफझईवर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी ती शाळेतून परत येत होती. तिच्या अंगावर असलेला गणवेश रक्तानं लाल झाला होता. त्या घटनेनंतर प्रथमच हा गणवेश सर्वसामान्यांना पाहायला मिळालाय.
नॉर्वेची राजधानी ओस्लोच्या नोबेल सेंटरमध्ये एका काचेच्या पेटील मलालाचा हा ऐतिहासिक युनिफॉर्म प्रदर्शित करण्यात आलाय. दोन महिन्यांसाठी हा युनिफॉर्म तिथं असेल त्यानंतर तो मलालाच्या कुटुंबियांना परत केला जाईल. हा गणवेश मलालासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी लढा देत असताना आपल्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे हा युनिफॉर्म आपल्या कार्याची आठवण करून देतो, अशी प्रतिक्रिया मलालानं व्यक्त केलीये. हा युनिफॉर्म मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देईल, अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केलीये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.