नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर इम्रानला 'साक्षात्कार'!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे खासदार इम्रान खान  यांना 'साक्षात्कार' झालाय. 

Updated: Dec 11, 2015, 10:28 PM IST
नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर इम्रानला 'साक्षात्कार'! title=

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानच्या तहरिक - ए - इन्साफ पक्षाचे खासदार इम्रान खान  यांना 'साक्षात्कार' झालाय. 
  
'पाकिस्तानमध्ये लहानपणापासूनच भारताचा द्वेष करतच आपण मोठे झालो. मात्र क्रिकेट निमित्तानं भारतात येऊन खेळण्याची संधी मिळाली. इथे आल्यानंतर आणि इथल्या विविध लोकांशी संवाद झाल्यानंतरच, आपला भारत आणि भारतीयांबाबतचा दृष्टिकोन बदलला' अशी प्रांजळ कबुली इम्रान खान यांनी दिली आहे.

भारत भेटीवर आलेल्या इम्रान खान यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पाकिस्तानात येण्याचं आमंत्रणही पाकिस्तानी संसदेचे खासदार असलेल्या इम्रान खान यांनी यावेळी नरेंद्र मोदींना दिलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.