लंडन : ब्रिटनची भावी महाराणी केट मिडल्टन यांना पुन्हा एकदा बाळाची चाहूल लागलीय.
प्रिन्स विल्यम्सची पत्नी केटनं गेल्याच वर्षी 7 जुलैला जॉर्ज या आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला होता.
केम्ब्रिजचे ड्युक आणि डचेसकडून क्लॉरेन्स हाऊसमधून जाहीर करण्यात आलेल्या एका बातमीत किंग पॅलेसचा हा आनंद जाहीर करून द्विगुणित करण्यात आलाय. यामध्ये, महारामी एलिझाबेथ द्वितीय आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य आनंद असल्याचं म्हटलं गेलंय.
पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनीही ट्विट करून आपल्याला या बातमीनं आनंद झाल्याचं म्हटलंय. केट आणि प्रिन्स विल्यम्स यांच्या घरी आणखी एक छोटा पाहुणा येणार असल्याचं समजल्यानंतर आपल्यालाही खूप आनंद झालाय असं डिव्हिड यांनी ट्विट केलंय.
महामहिम ड्युक आणि डचेस ऑफ केम्ब्रिज ही घोषणा करण्याताना खूप आनंदी आहेत की डचेस ऑफ केम्ब्रिज दुसऱ्या अपत्याला जन्म देणार आहेत, असं क्लॉरेन्स हाऊसकडून
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.