मुंबई : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं. याचे पुरावे देखील अनेकदा समोर आले आहे. उरी हल्ल्यानंतर रशियाने भारताचं समर्थन केलं आहे. रशियाने पाकिस्तानसोबत होणारा संयुक्त युद्धअभ्यास रद्द केला आहे.
रशियाने पाकिस्तानला एमआई-35 हॅलीकॉप्टर देखील न देण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया आणि पाकिस्तानमध्ये 'फ्रेंडशिप 2016' करार झाला होता. 24 सप्टेंबहर ते 7 ऑक्टोबर दरम्यान हा अभ्यास केला जाणार होता. पण भारताचं समर्थन करत रशियाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.
भारताने पाकिस्तानला उरी हल्ल्यानंतर आंतराष्ट्रीय स्तरावर घेरण्याची योजना बनवली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणत त्याला जागतिक समुहातून वेगळं करण्याची मागणी केली आहे.