मेलबर्न : सिडनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाय प्रोफाइल सामुदायिक स्वागत समारंभाचे सूत्रसंचालक करणारी महिला वादात अडकली आहे. सौदर्य स्पर्धा आयोजित करणाऱ्या एका संस्थेने आरोप लावला की स्वतःला ‘मिस इंडिया ऑस्ट्रेलिया’ चा खिताब विजेती सांगणाऱ्या या महिलाचा दावा खोटा आहे.
मिस इंडिया ऑस्ट्रेलिया कॉर्पोरेशनने दिलेल्या एका वक्तव्यात सांगितले की, राशी कपूर स्वतःला मिस इंडिया ऑस्ट्रेलिया म्हणून ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला सांगितले आहे. त्याद्वारे सिडनी अलफोंसे एरिनामध्ये आयोजित या स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन करीत आहेत. पण राशी कपूर यांनी अशा प्रकारचा कोणताही खिताब जिंकलेला नाही. मिस इंडिया ऑस्ट्रेलिया कॉर्पोरेशनच्या राष्ट्रीय निदेशक रिना कोआक यांनी सांगितले की, मिस इंडिया ऑस्ट्रेलिया हा खिताब एएसआयसी अंतर्गत २०१२ नुसार नोंदणीकृत आहे. अशा प्रकारची सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्याचा आम्हांला मान्यता आहे.
रिना यांनी सांगितले की, स्वतःला मिस इंडिया ऑस्ट्रेलिया म्हणून सांगणारी आणि पंतप्रधान मोदी यांच्या स्वागत समारंभाचे सूत्रसंचालक करणारी राशी कपूर हीने कधीही ही स्पर्धा जिंकली नाही. राशी कपूर यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखती या खिताबावर केलेला दावा धादांत खोटा आहे.
द्विपक्षीय संबंध मजबूत करताना मोदींचे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्वागत समारंभात आपल्या नोंदणीकृत खिताबाचा दुरूपयोगाबद्दल संस्थेने खेद व्यक्त केला आहे. या संदर्भात मिस इंडिया ऑस्ट्रेलिया कॉर्पोरेशनने राशी कपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून माफीनाम्यासह स्पष्टीकरण मागितले आहे. या संदर्भात राशी कपूर आणि त्यांच्य सहकाऱ्यांना ताकीद दिल्यानंतर त्यांना या संदर्भात कोणतेही पाऊल उचललं नाही.
आरोपांना उत्तर देताना राशीने आपल्या फेसबूक पेजवर लिहितांना सांगितले की, तिने २०१३ चा ‘मिस इंडिया ग्लोबल युनायटेड’ हा खिताब जिंकला होता. मीडियाने त्यातील एका भागाचा चुकीचा अर्थ लावला असेल. राशीने सांगितले. राशीने सांगितले की, स्वागत समारंभाचे सूत्रसंचालक करण्याची संधी एका ऑडिशनच्या माध्यमातून मिळाली आहे. हे एक स्वप्न साकार होण्यासारखे आहे. जेव्हा ऑडिशन झाले तेव्हा मला सांगण्यात आले की माझी निवड झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.