'बाहुबली'च्या सिक्वलची शूटींग लांबणीवर!

'बाहुबली' या सिनेमाच्या सिक्वलची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे... मात्र, प्रेक्षकांना थोडा धीर धरावा लागेल असं दिसतंय. 

Updated: Sep 3, 2015, 04:43 PM IST
'बाहुबली'च्या सिक्वलची शूटींग लांबणीवर!

मुंबई : 'बाहुबली' या सिनेमाच्या सिक्वलची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे... मात्र, प्रेक्षकांना थोडा धीर धरावा लागेल असं दिसतंय. 

'बाहुबली' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. प्रेक्षकांनी हा सिनेमा उचलून धरला होता... इतकंच नाही तर या सिनेमाच्या सिक्वलचीही उत्सुकता आता प्रेक्षकांना लागलीय.   

पण, 'बाहुबली : द कन्क्लुजन' या सिक्वलचं शूटींग मात्र पुढे ढकलण्यात आलंय. सप्टेंबर महिन्यात सुरु होणारं या सिनेमाचं सूटींग आता नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. 

खरं म्हणजे, या सिक्वल सिनेमाचं कथानक अगोदरच लीक झालंय... त्यामुळे, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना आपल्या आगामी सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करायचा निर्णय घेतलाय.  

'बाहुबली : द कन्क्लुजन' हा सिनेमा पुढच्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.