बाहुबली १, बाहुबली २ आधी पुन्हा रिलीज होणार

बाहुबली 2 चा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आता सगळीकडे बाहुबलीचीच चर्चा सुरू आहे. बाहुबली टू  एप्रिलमध्ये बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 19, 2017, 09:08 AM IST
बाहुबली १, बाहुबली २ आधी पुन्हा रिलीज होणार title=

मुंबई : बाहुबली 2 चा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आता सगळीकडे बाहुबलीचीच चर्चा सुरू आहे. बाहुबली टू  एप्रिलमध्ये बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. मात्र हा सिनेमा प्रदर्शित करण्याअगोदर काही दिवस आधी बाहुबली हा पहिला सिनेमादेखील पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

ज्यांनी आधीचा बाहुबली पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी बाहुबलीचा पहिला भाग पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं बाहुबलीच्या निर्मात्यांनी म्हटलंय. त्यामुळे बाहुबली बिगिनिंग ते बाहुबली कन्क्लुजन असा सगळाच प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे.