मुंबई : भारतीय 'कॉमेडी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
एव्हढच नाही तर भारतीनं गुपचूपपणे साखरपुडा केल्याचंही सांगितलं जातंय. हर्ष लिंबाचिया असं भारतीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव असल्याचं म्हटलं जातंय.
हर्ष हा कॉमेडी सीरियलसाठी लेखन करतो. त्यानं 'कॉमेडी सर्कस' या कार्यक्रमासाठीही लेखन केलं होतं.
भारतीनं आपले आणि हर्षचे अनेक फोटो सोशल वेबसाईट इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.