बॉलिवूडच्या अभिनेत्रींची राजकारणात वाटचाल..

खऱ्या राजकारणाची फार समजही ज्यांना नसेल किंवा राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नसेलही... पण जेव्हा राजकारणावरील चित्रपटांत भूमिकेचा विषय येतो तेव्हा त्या राजकीय व्यक्तीरेखा उभी करण्यात कुठेही कमी पडत नाहीत...  बॉलिवूडच्या अभिनेत्री पुढच्या वर्षी बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिका राजकीय विषयांवर आधारीत चित्रपटात प्रमुख स्त्री राजकारण्यांच्या भूमिका रंगवताना दिसणार आहेत.

Updated: Nov 22, 2014, 09:52 PM IST
बॉलिवूडच्या अभिनेत्रींची राजकारणात वाटचाल.. title=

मुंबई : खऱ्या राजकारणाची फार समजही ज्यांना नसेल किंवा राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नसेलही... पण जेव्हा राजकारणावरील चित्रपटांत भूमिकेचा विषय येतो तेव्हा त्या राजकीय व्यक्तीरेखा उभी करण्यात कुठेही कमी पडत नाहीत...  बॉलिवूडच्या अभिनेत्री पुढच्या वर्षी बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिका राजकीय विषयांवर आधारीत चित्रपटात प्रमुख स्त्री राजकारण्यांच्या भूमिका रंगवताना दिसणार आहेत.

सोनम कपूर, मल्लिका शेरावत, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा या त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये आपल्याला राजकीय डावपेच लढवताना दिसणार आहेत. सोनम कपूरचा अनुज चौहान यांच्या गाजलेल्या बॅटल फॉर बिटोरा या पुस्तकावर आधारीत चित्रपट येत आहे.

मल्लिका शेरावतने के.सी.बोकाडीया यांच्या 'डर्टी पॉलिटिक्स'मध्ये राजस्थानी महिला राजकारणी रंगवली आहे.

प्रियंका चोप्रा मधुर भांडारकरच्या 'मॅडमजी'मध्ये दिसणार आहे. यात प्रियंकाचा आयटम गर्लकडून राजकीय नेतृत्वाकडे झालेला प्रवास दाखवला आहे. राजकारणावर आता फक्त पुरुषांचेच वर्चस्व राहीलेले नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.