...असा झाला जियाचा गर्भपात, सीबीआय अहवालात धक्कादायक सत्य उघड

अभिनेत्री - मॉडेल जिया खान मृत्यू प्रकरणात 'हिरो'फेम अभिनेता आणि जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याचा सहभाग कशा आणि कोणत्या प्रकारे होता, हे सीबीआयनं फाईल केलेल्या चार्जशीटमध्ये मांडलंय. 

Updated: Dec 10, 2015, 05:24 PM IST
...असा झाला जियाचा गर्भपात, सीबीआय अहवालात धक्कादायक सत्य उघड

मुंबई : अभिनेत्री - मॉडेल जिया खान मृत्यू प्रकरणात 'हिरो'फेम अभिनेता आणि जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याचा सहभाग कशा आणि कोणत्या प्रकारे होता, हे सीबीआयनं फाईल केलेल्या चार्जशीटमध्ये मांडलंय. 

९ डिसेंबर रोजी सीबीआयनं फाईल केलेल्या या चार्जशीटमध्ये जियानं आत्महत्या केल्याचं म्हटलं असलं तरी या प्रकरणात सूरज पांचोलीला आरोपी बनवण्यात आलंय. २०१३ साली जियानं तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. 

भ्रूण नष्ट करण्याचा प्रयत्न
सीबीआयच्या अहवालानुसार, मृत्यूपूर्वी जिया चार महिन्यांची गर्भवती होती. याबद्दल तिनं तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली यालाही सांगितलं होतं. त्यानंतर सूरज लगेचच जियाला घेऊन एका फिजिशिअनकडे गेला... त्यानंतर त्यांनी एका गायनकोलॉजिस्टलाही संपर्क केला... आणि काही औषधही घेतली.  


जिया खान

जियाच्या जीवाला धोका होता, हे माहीत असूनही... 
या स्ट्राँग औषधांमुळे जियाला ब्लिडिंग सुरू झालं... पण, आपल्या अजून सुरूही न झालेल्या करिअरला धोका पोहचू शकतो, याची जाणीव झाल्यानं सूरजनं जियाला डॉक्टरकडे नेणं टाळलं... आणि घरीच आपल्या हातांनी त्यानं हे भ्रूण टॉयलेटमध्ये फ्लश केलं.

... म्हणून आत्महत्येचं पाऊल!
या घटनेमुळे पुरती हादरून गेलेली जिया तणावाखाली होती. त्यातच आणखी एका मुलीसोबत सूरजचे संबंध असल्याचंही तिला कुणकूण लागली... आणि त्यामुळेही सूरज-जियाची भांडणं झाली. यातूनच तिनं ३ जून २०१३ रोजी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

जियाच्या आईच्या तक्रारीनंतर जियाच्या मृत्यूनंतर तब्बल १३ महिन्यांनी मुंबई हायकोर्टानं या प्रकरणाची सूत्रं सीबीआयकडे सोपवली होती. जियाच्या आईनं आपल्या मुलचा मृत्यू ही 'आत्महत्या' नसून 'हत्या' असल्याचा आरोप केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.