मुंबई : नाना पाटेकर हसून हसून बेफान झाला आणि बसलेल्या सोफ्यावर लोळलेला पाहिला आहे का... हसून हसून त्याच्या डोळ्यातून पाणी आलेले तुम्ही पाहिले आहे का... नाही ना तर झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात नाना पाटेकरची ही हालत झाली होती.
प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाना पाटेकर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आले होते. यावेळी सागर कारंडे, कुशल बद्रीके, भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे यांनी जबरदस्त स्किट सादर केले.
या कार्यक्रमात मोठी सोनाली कुलकर्णी उपस्थित होती. त्याचा हा व्हिडिओ खाली दिला आहे. या व्हिडिओमध्ये २१.४५ मिनिटांनी हे स्किट सुरू होते. तेव्हापासून जी धम्माल होते, ती पाहून तुमचीही हसून हसून पुरेवाट लागेल हे नक्की...
पाहू या नाना पाटेकरची हसून वाट लागलेला व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.