सलमान आणि ऐश्वर्यांच्या अनपेक्षितरित्या टक्कर आणि...

सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे दीर्घकाळ प्रेमसंबंधांनंतर रस्ते वेगळे झाले असले तरी आता पुन्हा एकदा या दोघांची टक्कर होणार आहे.

Updated: Dec 24, 2015, 05:26 PM IST
सलमान आणि ऐश्वर्यांच्या अनपेक्षितरित्या टक्कर आणि...  title=

मुंबई : सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे दीर्घकाळ प्रेमसंबंधांनंतर रस्ते वेगळे झाले असले तरी आता पुन्हा एकदा या दोघांची टक्कर होणार आहे.

रिअल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये या दोघांची टक्कर होणार आहे. सलमान खान आपल्या आगामी 'सुलतान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या राय 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाची शुटींग पूर्ण करतेय. 

सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही सिनेमा २०१६ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे, पुढच्या दिवाळीत हे दोन्ही सिनेमा एकमेकांना टक्कर देतील. 

सलमानचा 'सुलतान' हा सिनेमा अगोदर ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. परंतु, शाहरुख खानशी सुधारलेल्या संबंधांनंतर त्यानं आपला निर्णय बदललाय. कारण, शाहरुखचा 'रईस' हा सिनेमाही पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 

करण जोहरनं सोशल वेबसाईटवर आपल्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय. हा सिनेमा २८ ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे देखील असतील.