'रोबोट'च्या सिक्वेलसाठी अक्षयची कमाई किती? जाणून घ्या...

'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमार लवकरच 'रोबोट'च्या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत पाहायला मिलणार आहे. पण, या एका सिनेमातून तो किती कमाई करतोय हे माहित आहे का?

Updated: Dec 18, 2015, 08:15 PM IST
'रोबोट'च्या सिक्वेलसाठी अक्षयची कमाई किती? जाणून घ्या...  title=

मुंबई : 'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमार लवकरच 'रोबोट'च्या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत पाहायला मिलणार आहे. पण, या एका सिनेमातून तो किती कमाई करतोय हे माहित आहे का?

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय या एका सिनेमासाठी २५ करोडोंचं मानधन घेणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, याआधी आलेल्या रजनीकांत आणि ऐश्वर्या राय फेम अभिनीत 'रोबोट'नं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. 

'रोबोट'चा सिक्वेल हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक खर्चिक सिनेमा असेल तसंच हा भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणार, असे आडाखे आत्तापासूनच बांधले जात आहेत. 

या सिनेमाच्या टीमनं जागतिक स्तरावरचे वेगवेगळ्या फिल्डचे अनेक एक्स्पर्ट मदतीसाठी घेतले आहेत. वेशभुषा, बॅकग्राऊंड म्युझिक, व्हीएफएक्स आणि अॅक्शन स्टंटसाठी हे सर्व जण काम करणार आहेत. 

हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जातंय.