सुबोध-मुक्ताचं 'हृदयांतर'... आले पुन्हा एकत्र!

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित 'हृदयांतर' चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'एक डाव धोबीपछाड' या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.

Updated: Apr 18, 2017, 08:07 PM IST
सुबोध-मुक्ताचं 'हृदयांतर'... आले पुन्हा एकत्र! title=

मुंबई : विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित 'हृदयांतर' चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'एक डाव धोबीपछाड' या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.

विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे या कलाकारांना मुख्य भूमिकेत पाहता येणार आहे.  


सुबोध - मुक्ता

या सिनेमाचा अनुभव व्यक्त करताना 'मुक्ता आणि मी दोघेही पुण्यातले आहोत. त्यामुळे आमची मैत्री आम्ही कॉलेजमध्ये असताना भाग घेतलेल्या, पुरूषोत्तम करंडक स्पर्धेपासूनची आहे. मुंबईत आल्यावर आम्ही बंधन मालिका केली. त्यानंतर एक डाव धोबी पछाड सिनेमा केला. ती माझी खूप जुनी मैत्रीण आहेच. पण तिच्या कामाबद्दल मला अतिशय आदरही आहे. तिच्यासोबत काम करताना मी नेहमीच रिलॅक्स असतो' असं सुबोधनं म्हटलंय. 

तर, महाविद्यालयात असतानाचा हॅंडसम हंक, ज्याच्याशी एकदा तरी बोलावंसं वाटावं असा लाखो तरूणींची धडकन‘दि सुबोध भावे’  ते माझा जिवलग मित्र सुब्या असा सुबोधच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास झालाय. सुरूवातीच्या काळात सुबोधने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाचे कॉस्च्युम्सही मी केले होते. आणि ‘हृदयांतर’ ही फिल्म आमच्या दोघांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय फिल्म असेल, अशा शब्दांत मुक्तानं आपल्या आठवणी शेअर केल्यात. 

विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर 9 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.