नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार

मुंबई : २००२ साली 'देवदास' प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच काळासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडच्या पडद्यावरुन एक्झिट घेतली होती.

Updated: Feb 20, 2016, 12:31 PM IST
नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार title=

मुंबई : २००२ साली 'देवदास' प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच काळासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडच्या पडद्यावरुन एक्झिट घेतली होती. या काळात तिच्या चाहत्यांनी तिला खूप मिस केलं. पण, आता माधुरी एका दमदार कमबॅकची वाट पाहतेय आणि तो तिला मिळाल्याची बातमी आहे.

नाही म्हणायला २००७ साली 'आजा नचले' मधून माधुरीने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं खरं. पण, ही फिल्म काही खास कमाल करू शकली नाही. त्यानंतर काही काळ माधुरीने पुन्हा एकदा ब्रेक घेतला आणि तिचे 'डेढ इश्किया' आणि 'गुलाब गँग' हे दोन चित्रपट आले. पण, त्यांनीही काही फारशी कमाल केली नाही.

आता मात्र माधुरी स्क्रिप्ट निवडण्याच्या बाबतीत फार सतर्क राहणार असं दिसतंय. ती 'इंग्लिश विंग्लीश' सारख्या एखाद्या स्क्रिप्टच्या शोधात होती. आता तिला अशी एक स्क्रिप्ट मिळाल्याची बातमी आहे.

एका मल्याळम फिल्मचा हा हिंदी सिक्वल असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत नाना पाटेकर दिसणार आहे. माधुरीने नुकताच या चित्रपटासाठी होकार दिल्याची बातमी आहे. आता हा चित्रपट कधी रिलीज होणार आणि त्यात इतर कोण कलाकार असणार ते मात्र समजू शकलेलं नाही.

वजूद, प्रहार, परिंदा आणि मोहरे यात माधुरी आणि नाना पाटेकर यापूर्वीही एकत्र दिसले आहेत.