बॉलिवूडमध्ये नवीन 'आशिकी', श्रद्धा आणि आदित्यची लव्हस्टोरी सुरू

'आशिकी-2' या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी आजही अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूरचं कौतुक होतं. या चित्रपटाचा विषय निघाला की, प्रेक्षक या जोडीच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक करतात.

Updated: Dec 9, 2014, 08:08 PM IST
बॉलिवूडमध्ये नवीन 'आशिकी', श्रद्धा आणि आदित्यची लव्हस्टोरी सुरू title=

मुंबई: 'आशिकी-2' या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी आजही अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूरचं कौतुक होतं. या चित्रपटाचा विषय निघाला की, प्रेक्षक या जोडीच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक करतात.

चित्रपटात मेड फॉर इच अदर वाटलेली ही जोडी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही परस्परांच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. आदित्य आणि श्रध्दाला जोडीनं फिरताना अनेक ठिकाणी पाहिलं गेलं. मात्र या दोघांनी नेहमीच त्यांच्या प्रेमाच्या नात्याचा नकार दिला आहे. 'वी आर जस्ट गुड फ्रेन्ड्स', असं टिपिकल उत्तर दोघंही आजवर देत आलेत.

आता असं कळलंय की,  श्रध्दा तिच्या शुटिंगच्या बीझी वेळापत्रकातून वेळ काढून खास आदित्यला भेटण्यासाठी काश्मीरला गेली होती. आदित्य काश्मीरमध्ये 'फितूर' या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. श्रध्दाला आदित्यसोबत चांगला वेळ घालवायचा होता म्हणून तिने काश्मीर गाठल्याची चर्चा आहे. त्यांच्यातील हा छुपाछुपाचा खेळ कितीवेळ चालू राहील काही सांगता येत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.