मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मराठीचं शिक्षण घेत आहे. तिच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी ती मराठी शिकतेय.
संजय लीला भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमात प्रियांका पेशव्यांची सम्राज्ञी काशीबाईची भूमिका करत आहे. या भूमिकेला योग्य न्याय मिळावा यासाठी प्रियांका मराठीचे धडे गिरवत आहे. या भूमिकेसाठी प्रियांकाला मराठी भाषेचे बारकावे समजून घेण्याची गरज आहे. तसंच मराठी भाषेतील उच्चार स्पष्ट असावेत यासाठी ती मराठी शिकत आहे.
सध्या चित्रपटाच्या शूटिंगमुळं प्रियांका व्यस्त आहे, म्हणून तिनं डबिंगच्यावेळी मराठीच्या शिक्षकांना उपस्थित राहू देण्याची परवानगी दिग्दर्शकांकडून घेतली आहे. चित्रपटात प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.