'फ्रॅन्डी'नंतर नागराजचा सैराट, 'सैराट'चं टीझर रिलीज

'फ्रॅन्डी'नंतर नागराज मंजुळे आता सैराट सिनेमा घेऊन येत आहे, सैराटचा टीझर झी स्टुडिओने रिलीज केला आहे.

Updated: Dec 21, 2015, 06:18 PM IST

मुंबई : 'फ्रॅन्डी'नंतर नागराज मंजुळे आता सैराट सिनेमा घेऊन येत आहे, सैराटचा टीझर झी स्टुडिओने रिलीज केला आहे. नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमा विषयी अनेकांना उत्सुकता आहे, तरीही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला या उन्हाळ्यात येणार आहे.

फॅन्डीनंतर सैराटची उत्सुकता लागण्याचं कारण म्हणजे फॅन्ड्री सिनेमा चांगलाच गाजला होता. सर्वात महत्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे सैराट सिनेमालाही अजय-अतुलने संगीतबद्ध केलं आहे. मराठी प्रेक्षकांसाठी सैराट ही नक्कीच मेजवानी ठरणार आहे.