'विघ्न'हर्त्याला निरोप देताना सलमाननंही धरला ताल...

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खान याच्या घरी बाप्पाचं आगमन झालं होतं. आज सलमान खान आणि कुटुंबियांना आपल्या घरच्या 'विघ्नहर्त्या'ला वाजत गाजत निरोप दिला.

Updated: Sep 19, 2015, 05:23 PM IST
'विघ्न'हर्त्याला निरोप देताना सलमाननंही धरला ताल...

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खान याच्या घरी बाप्पाचं आगमन झालं होतं. आज सलमान खान आणि कुटुंबियांना आपल्या घरच्या 'विघ्नहर्त्या'ला वाजत गाजत निरोप दिला.

आपल्या घरच्या बाप्पाचं घराच्या जवळच निर्माण करण्यात आलेल्या एका कृत्रिम तलावात सलमान खानच्याही बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.


सलमाननंही धरला ताल

बाप्पाच्या विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोल-ताशांचा गजर सुरू होता... या ढोल - ताशांवर सलमान खाननंही ताल धरला. 

यानिमित्तानं कदाचित, आपल्यावरचं 'विघ्न' दूर कर, अशीच प्रार्थना सलमाननं 'विघ्नहर्त्या'कडे केली असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.