सलमाननं जुहीला काढला जोरदार चिमटा!

'बिग बॉस सीझन ९' च्या स्टेजवर नुकतीच अभिनेत्री जुही चावलाही दाखल झाली होती. यावेळी, आपल्या जुन्या मैत्रिणीला पाहून सलमान भलताच खूश होता. यावेळी त्यानं बोलता-बोलतानाच जुहीला जोरदार शाब्दिक चिमटा काढला.

Updated: Jan 8, 2016, 04:43 PM IST
सलमाननं जुहीला काढला जोरदार चिमटा! title=

मुंबई : 'बिग बॉस सीझन ९' च्या स्टेजवर नुकतीच अभिनेत्री जुही चावलाही दाखल झाली होती. यावेळी, आपल्या जुन्या मैत्रिणीला पाहून सलमान भलताच खूश होता. यावेळी त्यानं बोलता-बोलतानाच जुहीला जोरदार शाब्दिक चिमटा काढला.

'चॉक अॅन्ड डस्टर' या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी जुही इथं दाखल झाली होती. यावेळी, जुहीनं आपण एकमेव समवयस्क हिरोईन आहोत जिनं सलमानसोबत काम केलेलं नाही, असं म्हटलं.

यावेळी, सलमाननंही खूप वर्षांपूर्वी जुहीनं सलमानसोबत काम करण्यास नकार दिल्याची आठवण तिला करून दिली.

इतकंच नाही, तर एका दिग्दर्शकाला सलमाननं जुहीचं नाव सुचवलं... दिग्दर्शकानं संपर्क साधल्यानंतर जुहीनं मात्र आपल्या हिरोच्या भूमिकेत आमिरचं नाव सुचवलं, अशी आठवणही सलमाननं यावेळी शेअर केली. 

मग, मात्र जुहीनं आत्तापर्यंत केलं नसलं तरी आत्ता आपण एकत्र काम करू शकतो असं म्हटलं... तेव्हा तातडीनं सलमाननं जुहीला म्हटलं की 'आता तुला माझ्या आईचं काम करावं लागेल'... यावेळी, जुहीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.