नवरदेव शाहिद कपूरसह वऱ्हाड दिल्लीत, उद्या लग्नसमारंभ!

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचं उद्या ७ जुलैला लग्न आहे. लग्नसोहळ्यासाठी शाहिदसह सर्व वऱ्हाडी आज दिल्लीला रवाना झाले. उद्या गुडगावला शाहिद-मीराचा विवाहसोहळा आहे. आज दुपारी १ वाजता शाहिद कपूर मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाला. वरात आज सकाळीच दिल्लीला पोहोचली. शाहिदची आई सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर दिल्लीत पोहोचले. 

Updated: Jul 6, 2015, 07:33 PM IST
नवरदेव शाहिद कपूरसह वऱ्हाड दिल्लीत, उद्या लग्नसमारंभ! title=

मुंबई: शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचं उद्या ७ जुलैला लग्न आहे. लग्नसोहळ्यासाठी शाहिदसह सर्व वऱ्हाडी आज दिल्लीला रवाना झाले. उद्या गुडगावला शाहिद-मीराचा विवाहसोहळा आहे. आज दुपारी १ वाजता शाहिद कपूर मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाला. वरात आज सकाळीच दिल्लीला पोहोचली. शाहिदची आई सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर दिल्लीत पोहोचले. 

शाहिदच्या लग्नाचं निमंत्रण कार्ड तयार करणारे डिझायनर रवीश कपूर म्हणाले, विवाह आणि रिसेप्शनसाठी जवळपास ५०० जणांना निमंत्रण दिलं गेलंय. रिसेप्शनसाठी वेगळं कार्ड डिझाईन केलं गेलंय. रवीश कपूरच्या ग्राहकांमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि हृतिक रोशनचा समावेश आहे.

लग्न समारंभ गुडगावला

लग्नाशी संबंधीत सर्व समारंभ हे मीरा राजपूतच्या छतरपूर इथल्या फार्म हाऊसवर होणार आहेत. लग्नाची ग्रँड पार्टी गुडगावच्या हॉटेलमध्ये होईल. या लग्नात शाहिद-मीराचे कुटुंबीय, दोघांचा मित्रपरिवार आणि धार्मिक समुदाय राधा-स्वामी सत्संगशी निगडित लोक सहभागी होतील. 

शाहिदनं केली लग्नाची सर्व तयारी

शाहिद कपूरनं जरी लग्नासंदर्भात मीडियामध्ये जास्त चर्चा केली नसली तर त्यानं आपल्या लग्नाची प्रत्येक तयारी स्वत: केल्याचं कळतंय. लग्नाच्या निमंत्रण पत्रासह चहाचा एक पुडा पाठवला गेलाय. कारण वडील पंकज कपूर चहाचे खूप चाहते आहेत. पत्रिकेचे डिझायनर रवीश कपूर म्हणाले, हा एक विशेष चहा आहे ज्यात सहद आणि चहाचं मिश्रण आहे.  

रिसेप्शन:

शाहिदच्या लग्नाचं रिसेप्शन १२ जुलैला मुंबईत होणार आहे. रिसेप्शनला बॉलिवूडचे मोठमोठे स्टार्स सहभागी होतील. 

वॉर्डरोब: 

शाहिदसाठी ड्रेस डिझाईन करण्याचं काम डिझायनर कुणाल रावलनं केलंय. कुणालनं शाहिदसाठी १० आउटफीट्स डिझाइन केलेत. यात गळाबंद सारखे पारंपरिक पोशाखांचा सुद्धा समावेश आहे. तर दुसरीकडे नवरी मीरासाठी अनामिका खन्नानं ड्रेस डिझाइन केलाय. सूत्रांनुसार या जोडप्याचा ड्रेस कलर कॉम्बिनेशन एकमेकांना क्रॉन्टास्ट असेल. 

बॅचलर पार्टी: 

बॅचलर पार्टीसाठी शाहिद लग्नापूर्वी ग्रीसला जाणार असल्याची चर्चा होती. पण बिझी शेड्यूलमुळे शाहिदनं आपली बॅचलर पार्टी ट्रीप कँसल केली. तर मीराच्या मित्रांनी जोडप्यासाठी छतरपूरच्या फॉर्महाऊसमध्ये स्पेशल पार्टी ठेवली होती. त्यासाठी शाहिद दिल्लीत गेला होता.

मेन्यू: 

एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबीय राधा स्वामी सत्संगचा भाग आहे. त्यामुळं लग्नातील जेवण पूर्णत: शाकाहारी असेल. गुडगावमध्ये होणाऱ्या लग्नसमारंभात इंडियन सोबतच कॉन्टिनेंटल फूड असेल. शाहिदचे कुटुंबीय आणि मित्र परिवारानं मीराच्या कुटुंबियांसोबत बसून मेन्यू फायनल केलाय. 

सोबतच लग्नात फॅन्सी जयपूरी पानाचा स्पेशल स्टॉलही असणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.