'SO CALLED शिवभक्त' होतोय व्हायरल

शिवजयंतीच्या निमित्ताने अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेली ५ मिनिटांची ही कलाकृती व्हॉटस अॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2017, 07:42 PM IST

जळगाव : शिवजयंतीच्या निमित्ताने अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेली ५ मिनिटांची ही कलाकृती व्हॉटस अॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. 

'सो कॉल़्ड शिवभक्त' नावाचा हा अवघ्या ५ मिनिटांचा लघुचित्रपट आहे.

एका प्रकारे ग्रामीण भागात, तंत्रज्ञानाचा वाणवा असताना, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ५ मिनिटाच्या लघु चित्रपटात लाईट, कॅमेरा अँगल, व्हिडीओ एडिटिंग चांगल्या दर्जाचं आहे, संगीत उत्कृष्ट करण्यात आलं आहे. 

शेवटी बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाच्या गाण्याने शेवट करण्यात आला आहे, हा अधिक भावूक वाटतो. 

या चित्रपटातील तरूणांचा अभिनय देखील तोडीस तोड आहे, भविष्यात ही एक चांगली टीम ठरू शकते, अशी आशा प्रताप महाविद्यालयातील शिक्षकांना आहे.