शाहिद आणि मीरा दिल्लीहून मुंबईसाठी रवाना

Updated: Jul 9, 2015, 11:18 AM IST


शाहिद - मीरा

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे नवविवाहीत दाम्पत्य आज दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालेत.

आज दिल्ली विमानतळावर हे जोडपं कॅमेऱ्यात कैद झालंय. दोघंही एकमेकांच्या हातात हात घालून विमानतळावर दिसले. 

मंगळवारी गुडगावच्या एका हॉटेलमध्ये काही निवडक लोकांच्या उपस्थितीत शाहिद आणि मीराचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नापासून शाहिदनं बॉलिवूडला आणि मीडियाला जरा दूरच ठेवलं. 

अत्यंत साध्या पद्धतीनं आणि खाजगी वातावरणात पार पडलेल्या या लग्नाची चर्चा मात्र जोरदार झाली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.