आलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.

PTI | Updated: Aug 12, 2015, 12:03 PM IST
आलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर

मुंबई: अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.

शाहिदचं म्हणणं आहे की, नेहमी आलिया आणि करीना यांच्यात तुलना केली जाते. मात्र ही आलियासाठी स्तुतीची बाब आहे की तिची तुलना करीना सोबत होतेय. शाहिद म्हणतो, करीना एक प्रस्थापित कलाकार आहे, तर आलिया सुद्धा चांगले चित्रपट करतेय.

शाहिद आलिया आणि करीना सोबत अभिषेक चौबेंच्या 'उडता पंजाब'मध्ये एकत्र दिसणार आहे. करीना कपूरसोबत २००९मध्ये ब्रेक अप झाल्यानंतर शाहिदचा हा तिच्यासोबत चित्रपट असेल. तर आलियासोबत 'शानदार'मध्ये शाहिदनं काम केलंय. येत्या २२ ऑक्टोबरला 'शानदार' रिलीज होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.