...म्हणून आतापर्यंत अभिनेषेकने नाही पाहिला 'ऐ दिल... सिनेमा

'ऐ दिल है मुश्किल 'या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या बोल्ड सीन्समुळे नाराज झालेल्या बच्चन परिवारातील सदस्यांनी अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाहीये.

Updated: Nov 5, 2016, 12:26 PM IST
...म्हणून आतापर्यंत अभिनेषेकने नाही पाहिला 'ऐ दिल... सिनेमा

मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल 'या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या बोल्ड सीन्समुळे नाराज झालेल्या बच्चन परिवारातील सदस्यांनी अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाहीये.

अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासह ऐश्वर्याचा पती अभिषेकनेही अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा त्याला याबाबत विचारण्यात आले तेव्हा ऐश्वर्याचा सिनेमा न बघण्यामागचे कारण सांगितले.

अभिषेक म्हणाला, मी सध्या माझ्या फुटबॉल टीमसोबत प्रवास करतोय. त्यामुळे सिनेमा पाहिलेला नाही. मात्र लवकरच मी हा सिनेमा पाहीन तसेच करण जोहरला त्याच्या यशाबद्दल शुभेच्छाही द्यायच्या आहेत. अभिषेकने यावेळी ऐश्वर्याचीही स्तुती केली. या सिनेमात ती सुंदर दिसत असल्याचे तो म्हणाला.