सलमानच्या आयुष्यात आणखीन एका अभिनेत्रीची एन्ट्री!

सलमान आयुष्यभर बॅचलरचं राहिल असं दिसतंय.कितीही नायिकांबरोबर सलमानचं लिंकअप्स केले तरी सलमान काही बोहोल्यावर चढणार नाही, असचं दिसतंय. म्हणूनच सलमानने लूलिया बाय-बाय केल्याची चर्चा बीटाऊनमध्ये सध्या रंगतेय. एवढचं नाही तर सलमानच्या आयुष्यात एका नव्या हिरोईनची एन्ट्रीही झालीय.

Updated: Nov 16, 2016, 10:51 AM IST
सलमानच्या आयुष्यात आणखीन एका अभिनेत्रीची एन्ट्री! title=

मुंबई : सलमान आयुष्यभर बॅचलरचं राहिल असं दिसतंय.कितीही नायिकांबरोबर सलमानचं लिंकअप्स केले तरी सलमान काही बोहोल्यावर चढणार नाही, असचं दिसतंय. म्हणूनच सलमानने लूलिया बाय-बाय केल्याची चर्चा बीटाऊनमध्ये सध्या रंगतेय. एवढचं नाही तर सलमानच्या आयुष्यात एका नव्या हिरोईनची एन्ट्रीही झालीय.

सलमान खानमुळे सध्या आणखीन एक मॉडेल आणि अभिनेत्री चर्चेचा विषय बनलीय. 'सनम रे' फेम उर्वशी रौतेला आता दिलदार सुलतानच्या सपोर्टची वाट बघतेय. एवढचं नाही तर उर्वशी खान फॅमिलीच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करतेय. 

उर्वशीला बऱ्याचदा सलमानच्या घरी बघण्यात आलय. सुल्तानमध्ये याआधी उर्वशीला कास्ट करण्यात आलं होतं मात्र 'मिस युनिव्हर्स ब्युटी कॉन्टेस्ट'मुळे उर्वशीने हा बिग बजेट सिनेमा सोडला... आणि आता तिच उर्वशी सलमानच्या होकाराच्या प्रतिक्षेत आहे.


सलमान आणि उर्वशी

सलमान आणि उर्वशीच्या अफेअरची चर्चाही सध्या बीटाऊनमध्ये रंगते आहे. त्यामुळेच उर्वशीने सलमानची गर्लफ्रेण्ड लुलिया वंतूरला सलमानच्या आयुष्यातुन एक्झिट घ्यायला भाग पाडले आहे. व्हिझा प्रॉब्लेममुळे लुलिया बऱ्याच महिन्यांपासून रोमानियात आहे... आणि इकडे सलमान त्याच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे... एवढचं नाही तर या लव्हस्टोरीमध्ये आता उर्वशीची एन्ट्री झालीय.

लुलिया आणि सलमान बऱ्याच वर्षांपासून एकत्र होते. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र फिरतांनाही बघितलं होतं. त्यामुळेच हे दोघं लवकरचं लग्न करतील असा अंदाज लावला जात होता. मात्र हा अंदाज फोल ठरला असून दबंग खानने पुन्हा एकदा आपली कमिटमेंट तोडलीय. त्यामुळेच लुलियाचं नावही सलमानच्या एक्सच्या यादीत समाविष्ट झालंय. सलमानच्या लव्ह लाईफमध्ये त्याच्या फॅन्सना प्रचंड इंटरेस्ट असतो. आता सलमान उर्वशीलाही बॉलिवूडमध्ये स्थिर होण्यासाठी मदतीचा हात देणार का? हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.