मुंबई: नवोदित अभिनेत्री अमायरा दस्तूर इमरान हाश्मीला घाबरली होती. तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर एक्स'मध्ये सीरियल किसर नावानं प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी अमायराच्या हिरोच्या भूमिकेत आहे. त्यामुळं या चित्रपटाला होकार देतांना पहिले देऊ की, नाही असा संशय होता.
अमायरानं सांगितलं, मी इमरान हाश्मीसोबत काम करायला सुरूवातीला घाबरली होती. मात्र चित्रपट दिग्दर्शक विक्रम भटट्नं स्पष्ट केलं होतं की, हा एक असाधारण आणि यू/ए प्रमाणपत्र असणाऱ्या सारखा चित्रपट आहे. त्यानंतर मी या चित्रपटात काम करायला तयार झाली. सेटवर इमराननं तिचा अनकंफर्टेबल पणा दूर करण्यात मदत केली.
२१ वर्षीय अमायरानं सांगितलं, इमराननं मला खूप रिलॅक्स्ड केलं. चित्रपटाची कथा वाचल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. इमरान कमालचा अभिनेता आहे. त्याचा हजरजबाबपणा खूप कमालीचा आहे आणि त्यानं मला खूप मदत केली.
अमायरानं मनीष तिवारीचा चित्रपट 'इशक' द्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. यात त्याचा अभिनेता होता प्रतिक बब्बर... विशेष फिल्म्स निर्मित आणि विक्रम भट्ट दिग्दर्शित 'मिस्टर एक्स' मध्ये इमरान हाश्मी अदृश्य होणाऱ्या तरूणाची भूमिका साकारतोय, जो त्याच्यासोबत वाईट वागणाऱ्यांचा बदला घेतो. ही फिल्म १७ एप्रिलला रिलीज होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.