व्हिडिओ : पाहा, 'मेरी कोम'च्या भूमिकेतील प्रियांका!

भारतीय बॉक्सर मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित 'मेरी कोम' या सिनेमाचा आज ट्रेलर लॉनच करण्यात आलाय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 23, 2014, 02:58 PM IST
व्हिडिओ : पाहा, 'मेरी कोम'च्या भूमिकेतील प्रियांका! title=

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित 'मेरी कोम' या सिनेमाचा आज ट्रेलर लॉनच करण्यात आलाय. 

अभिनेत्री प्रियांका चोपडा हिनं या सिनेमासाठी घेतलेली मेहनत प्रेक्षकांपासून लपून राहणार नाही. 'मेरी कोम'चा ट्रेलर आज सोशल वेबसाईट यू ट्यूबवर जाहीर करण्यात आलाय. 

ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सर मेरी कोम हिची भूमिका या सिनेमात प्रियांकानं साकारलीय. 'स्पोर्टस ड्रामा' असलेल्या या सिनेमातली भूमिका ही आपली आजवरची सर्वात कठिण भूमिका ठरल्याचं प्रियांका म्हणते. राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेल्या प्रियांकासाठीही ही भूमिका चॅलेंज ठरलीय... आणि त्यासाठी तीनं खूप मेहनतही घेतलीय.

येत्या 5 सप्टेंबर रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भारद्वाज निर्मित 'हैदर' आणि सिद्धार्थ आनंद निर्मित 'बँग बँग' हे सिनेमेही याच दिवशी प्रदर्शित होण्याच्या तयारीत असल्यानं 'मेरी कोम'चं प्रदर्शन 2 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.