पाहा रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर काय म्हणतेय कॅटरिना...

नवी दिल्ली : काही वर्षाच्या अफेअरनंतर आता कॅटरिना आणि रणबीर कपूर हे वेगळे झाल्याच्या बातम्या काल इंटरनेटवर आल्या आहेत.  

Updated: Jan 16, 2016, 07:22 PM IST
पाहा रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर काय म्हणतेय कॅटरिना... title=
नवी दिल्ली : काही वर्षाच्या अफेअरनंतर आता कॅटरिना आणि रणबीर कपूर हे वेगळे झाल्याच्या बातम्या काल इंटरनेटवर आल्या आहेत.


स्पेनमधील त्यांच्या सुट्टीचे फोटो प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या अफेअरची खूपच चर्चा रंगली होती. पण आता मात्र हा सर्व भूतकाळ होता असंच म्हणायला हवं.




दोघांमधला दुरावा आता इतका वाढलाय की त्यांनी एकत्र काम करायलाही नकार दिला होता. त्यामुळे 'जग्गा जासूस' या चित्रपटाचं शूटींगही एक आठवडा अडकलं होतं.



काल दिल्लीत झालेल्या मनीष मल्होत्रा फॅशन शोदरम्यान कॅटरिनाला मीडियाने याविषयी विचारलं असता तिने उत्तर द्यायला नकार दिला. "इथे आपण मनीषसाठी आलो आहोत तर आपण त्यावरून विषय वळवायला नको", असं ती म्हणाली.



आता कॅटरिनाच्या या उत्तरावरुन तरी सारं काही आलबेल नाही असंच म्हणावं लागेल