विराट आऊट; अनुष्का ठरली 'राष्ट्रीय पनौती!'

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तिच्या अभिनयासाठी कधी कुणाची बोलणी ऐकून घ्यावी लागली नसतील, पण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये क्रिकेट विराट कोहली एका धाव काढून आऊट झाल्यामुळे मात्र तिला नको नको ते ऐकून घ्यावं लागतंय. व्हॉटसअपवर फिरणाऱ्या जोक्सप्रमाणे तर अनुष्काला 'राष्ट्रीय पनौती' म्हणून घोषित करण्यात आलंय. 

Updated: Mar 26, 2015, 04:34 PM IST
विराट आऊट; अनुष्का ठरली 'राष्ट्रीय पनौती!' title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तिच्या अभिनयासाठी कधी कुणाची बोलणी ऐकून घ्यावी लागली नसतील, पण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये क्रिकेट विराट कोहली एका धाव काढून आऊट झाल्यामुळे मात्र तिला नको नको ते ऐकून घ्यावं लागतंय. व्हॉटसअपवर फिरणाऱ्या जोक्सप्रमाणे तर अनुष्काला 'राष्ट्रीय पनौती' म्हणून घोषित करण्यात आलंय. 

विराटची विकेट उडाल्यानंतर साहजिकच सगळ्यांची नजर पॅव्हेलियनमध्ये टीम इंडियाला चिअर करण्यासाठी बसलेल्या अनुष्काकडे वळली... विराटच्या बाद होण्यामागचं कारण अनुष्काच असल्याचं ठरवून टाकत लगेचच सोशल वेबसाईटस् आणि व्हॉटसअपवर अनुष्काबद्दल अनेक कमेटसना ऊत आला. 

विराट आणि अनुष्कानं सध्या काहीही न बोलता खुल्लमखुल्ला आपल्या प्रेमाचा स्वीकार केलाय. ही खास मॅच पाहण्यासाठी अनुष्का सिडनीमध्ये उपस्थित झाली होती. त्यामुळे, तिच्याबद्दल अगोदरपासूनच अनेक जोक्स शेअर केले जात होते.  
 
सोशल वेबसाईटवर आलेल्या काही कमेंटस्...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.