‘गडकरींसाठी राजीनामा द्यायलाही तयार’

सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नितीन गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावं अशी, मागणी भाजपचे काही खासदार करताहेत. गडकरी राज्यात परतणार असतील तर त्यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दाखवली आहे.

Updated: Oct 22, 2014, 10:45 PM IST
‘गडकरींसाठी राजीनामा द्यायलाही तयार’ title=

नागपूर : सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नितीन गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावं अशी, मागणी भाजपचे काही खासदार करताहेत. गडकरी राज्यात परतणार असतील तर त्यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दाखवली आहे.

दुसरीकडे, भाजपमधल्या ज्यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत तेही यावर काही न बोलणंच पसंत करतायत... ‘भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कसलीही स्पर्धा सुरू नाही’ असा दावा भाजप नेते विनोद तावडे यांनी आज पुन्हा एकदा केलाय.

तर, दबाव टाकणे हे भाजपच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही, निवडून आलेल्या सर्व सदस्यांशी चर्चा करून संसदीय मंडळासमोर विषय ठेवल्यानंतर नेता निवडला जातो ही एक पद्धत आहे, असं भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करावे यासाठी काही आमदारांनी लॉबिंग सुरु केलंय या विषयावर खडसे यांना विचारले असता जळगावात त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.