मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागलेत कामाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शपथविधी झाल्याबरोबर कामाला लागले आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज पुन्हा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 

Updated: Nov 1, 2014, 08:07 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागलेत कामाला title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शपथविधी झाल्याबरोबर कामाला लागले आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज पुन्हा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 

या बैठकीत ऊर्जा, गृह, कृषी आणि अर्थ या प्रमुख खात्यांचे प्रेझेंटेशन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसमोर शासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी केलं. या प्रमुख विभागातील काय स्थिती आहे, कोणत्या योजना सुरू आहेत, कोणत्या योजना सुरू करण्याची आवश्यकता आहे, आदी बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नवे निर्णय घेण्यासाठी तसेच प्रत्येक विभागात सुधारणा करण्यासाठी हे प्रेझेंटेशन फायदेशीर ठरणार आहे.

शपथ घेतलेल्या 10 मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री स्वत:कडे गृह आणि वित्त खाते ठेवण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेल्या एकनाथ खडसेंकडे महसूल खाते सोपवले जाण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.