मुंबई : निवडनुकीनंतर सत्तास्थापन करताना गरज पडली तर शिवसेनेशी चर्चा करू, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलीय.
महत्त्वाचं रामदास आठवलेंच्या याच प्रतिक्रियेशी साधर्म्य असणारी प्रतिक्रिया नुकतीच काही दिवसांपूर्वी भाजप नेते नितीन गडकरी यांनीही दिली होती. त्यातच आठवलेंनी आपली भूमिका जाहीर केल्याने यापुढची राजकीय गणितं काय असतील याकडे सर्वांच लक्ष लागलय.
विक्रोळी मतदार संघातून रिपाईचे उमेदवार विवेक पंडित यांच्या प्रचारसभेत रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलंय. नुकतंच बंड करत शिवसेनेत प्रवेश केलेल्या अर्जुन डांगळेसाठी अजूनही रिपाईची दारं खुली आहेत, निवडणूक संपल्यावर डांगळे पुन्हा ‘आरपीआय’मध्ये येतील, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
शिवसेनेचा ‘विश्वासघात’ करणाऱ्या भाजपच्या आणि आठवलेंच्या या प्रतिक्रियेवर आता उद्धव ठाकरे काय भूमिका आहे, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.