कुडाळमध्ये राडा, नागरिक-पोलीस यांच्यात बाचाबाची

निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या राखीव पोलिस दलाचे पोलीस आणि कुड़ाळमधील स्थानिक नागरिक यांच्यात आज दुपारी राडा झाला.

Updated: Oct 16, 2014, 07:11 PM IST
कुडाळमध्ये राडा, नागरिक-पोलीस यांच्यात बाचाबाची title=

सिंधुदुर्ग : निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या राखीव पोलिस दलाचे पोलीस आणि कुड़ाळमधील स्थानिक नागरिक यांच्यात आज दुपारी राडा झाला.

पोलीस, राखीव दलाच्या तुकडीतील काही कर्मचारी शहरातील स्टॉलवर गेले होते. यावेळी दुकानदार आणि कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. या बचाबाचीचे पर्यवसान माराहाणीत झाले. दोन्हींकडून एकमेंकाना मारहाण करण्यात आली. संबधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दखल करावा यासाठी नंतर जमाव मोठ्या संखेने पोलीस स्थानकात पोहोचला.

त्याचवेळी काँग्रेसचे नेते नारायण राणे हेही पोलीस स्थानकात पोहोचल्यावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातापरण होते.
 
दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदान झाले आहे. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले आहे.  

मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशी मंगळवारी रात्री पराड गावात काँग्रेस कार्यकर्ता राजू पराडकर हा मतदारांना पैशाचे आमिष दाखवत असल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून निवडणूक भरारी पथकाच्या स्वाधीन केले. त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.