धारावीत शिवसेना विरुद्ध काँग्रेसमध्येच चुरस
मुंबईतील सर्वात मोठ्ठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार असून धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
शिवडीत मनसे-शिवसेनेत कडवी झुंज
शिवडी मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सेना, मनसे उमेदवारांचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. शिवडी मतदारसंघाचा हा लेखाजोखा.
राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात स्मारकांना प्राधान्य
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे आणि दृष्टीपत्रे जाहीर केलीत. महाराष्ट्राचा भविष्यातला चेहरा कसा असेल, याचं प्रतिबिंब खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये उमटायला हवा होता. पण राजकीय पक्षांना नागरिकांच्या सोयीसुविधांची चिंता कमी आणि पुतळ्यांची जास्त काळजी लागून राहिलीय.
सकाळच्या सर्वेत कोणालाही नाही स्पष्ट बहुमत
‘सकाळ’च्या राज्यव्यापी सर्वेमध्ये त्रिशंकू स्थिती असल्याचे दिसते आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या, काँग्रेस चौथ्या आणि मनसे-अन्य पाचव्या क्रमांकावर असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज - उद्धव ठाकरे एकत्र येतील - शर्मिला ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याची चर्चा असताना राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोघे भाऊ एकत्र येतील असे संकेत दिलेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे नक्कीच येऊ शकतात, असा विश्वास शर्मिला यांनी व्यक्त केलाय.
उद्धव - राज एकत्र आले तर आनंद - नारायण राणे
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून आहे. मात्र, एकत्र येण्याची टाळी वाजली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा पुन्हा सुरु झाली. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चा खरी असल्याचे स्पष्ट झाले.
अमळनेर येथे ६२ तर सांगलीत ५ लाखांची रोकड जप्त
अमळनेरमध्ये विप्रो रस्ता येथे ६२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पाटील प्लाझामध्ये तीन बॅगांमध्ये ही रक्कम सापडली. जगदीश मधुकर चौधरी (रा.नंदुरबार) योगेश भिका चौधरी( रा.नंदुरबार) यांच्याकडील रोकड निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. आज सकाळी सांगलीत ५ लाखांची रोकड सापडली.
धनंजय मुंडे यांच्यात नेतृत्व करण्याची धमक : पवार
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या सभांना राज्यात भरघोस प्रतिसाद मिळत आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची धमक असल्याचं म्हटलं आहे.
नेतेही झाले ‘टेक्नोसॅव्ही’; पंकजाचं ‘टेलिफोनिक’ भाषण
सध्याच्या तरुणांसोबत राजकारणातील नेतेही टेक्नोसॅव्ही झालेत. त्याचंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं ते साताऱ्यात...
एबीपीच्या सर्वेतही भाजप क्रमांक १
एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्वेमध्येही भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे पाचव्या क्रमांकाचा पक्ष असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
इंडिया टुडेचा सर्वे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असून दुसऱ्या स्थानावर शिवसेना राहणार असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी आणि चौथ्या स्थानावर काँग्रेस फेकला गेला आहे.
आचारसंहितेचा भंग अजितदादांना महागात पडणार?
ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
शिवसेनेचं हे गीत होतंय व्हायरल
शिवसेनेचं शिवसेना गीत हे राजकीय पक्षांमध्ये यू-ट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय गाणं ठरलंय, शिवसेनेवर नंतर अनेक गाणी आली. पण, हे गाणं शिवसैनिकांच्या मनात कायम असल्याचं दिसून येतंय.
भाजपच्या 'दृष्टीपत्रा'त स्वतंत्र विदर्भ 'दृष्टीआड'
निवडणूक प्रचारात आघाडी घेणाऱ्या भाजपनं आपला जाहीरनामा मात्र सर्वात शेवटी प्रसिद्ध केलाय. भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख ‘दृष्टीपत्र’ असा करण्यात आलाय. मात्र, या दृष्टीपत्रात साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
पाकला दिलं प्रत्यूत्तर, पुन्हा अशी चूक करणार नाही - मोदी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी फिरताना दिसतायत. आज त्यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली. पाकिस्तानकडून सध्या सुरु असलेल्या सीजफायर उल्लंघनावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार केलाय.
मोदींची एकाधिकारशाही, रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचंय- पृथ्वीराज चव्हाण
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या एकाधिकारशाहीवर टीका केलीय. मोदींना सर्व राज्यांचाही रिमोट कंट्रोल आपल्या हाती हवाय.
आधीचे भ्रष्टाचारी नेते आता भाजपसाठी संत झालेत - पवार
भाजपनं काही वर्षांपूर्वी आमच्या मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विधीमंडळात गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. मात्र त्यावेळी भाजपसाठी जे भ्रष्टाचारी होते ते आता संत झालेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे.
आज बाळासाहेब जिवंत असते तर... - राजनाथ सिंह
गृहमंत्री राजनाथ सिंह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत... युती तुटल्यानंतर, ऐन निवडणुकीच्या सणात त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आलीय.
शिवसेनेचा वचननामा जाहीर
शिवसेनेने आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्री या निवासस्थानी पक्षाचा वचननामा जाहीर केला. यामध्ये मुंबईच्या वैभवात आणि समृद्धी भर टाकणारे प्रकल्प उभारण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले आहे.
अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून रोकड, मतदार यादी जप्त
मांटुग्यातल्या अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून दहा हजार रुपयांची रोकड आणि निवडणूक मतदार यादी जप्त करण्यात आलीय.