नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, महाभारताच्या काळात अमेरिका नव्हती, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर केलीय. गिरगावला मनसेचे उमेदवार राजेंद्र शिरोडकर यांच्या प्रचारासाठी ते आले होते.
मुंबई, महाराष्ट्राची शक्ती देशाच्या विकासासाठी मला आवश्यक- मोदी
आज प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाण्यात सभा झालीय. या सभेत बोलतांना मोदींनी देशाच्या विकासासाठी मुंबई, महाराष्ट्राची शक्ती किती आवश्यक आहे, याबद्दल सांगितलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोदींच्या या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून शिवसेना-मनसेबद्दल ते काहीही बोलले नाहीत.
१०० दिवसांत काळापैसा आणण्याचं आश्वासन कुठे गेलं?- अजित पवार
मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीवेळी १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. पण आता सरकार येऊन ६ महिने झाले. या घोषणेचं झालं, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारलाय. ते पुण्यात बोलत होते.
UPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे
आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.
महात्मा गांधीच्या विचारांच्या विरुद्ध मोदींचे वर्तन - राहुल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीजी यांच्या विचारांच्या विरोधात वागत आहे. त्यांचे वर्तन गांधींच्या विसंगत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
उद्धवने शिवसेना चांगली वाढवली - पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष वाढीसाठी उध्दवची कष्ट करण्याची तयारी दिसून येते. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे घेऊन पक्षाचा विस्तार केलाय, अशी स्तुती पवार यांनी केली.
राज ठाकरे यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंगचा गुन्हा केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार, आर आर यांचे वक्तव्य निंदनिय - पवार
राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस राजी नसल्याचे दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार शरद पवार यांनी केला. त्याचवेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या वक्तव्याची निंदा केली. महिलांविषयी वक्तव्य निंदनिय आहे, असे पवार म्हणाले.
मनसेच्या घाटकोपरमधील कार्यालयाची तोडफोड
घाटकोपरमध्ये मनसे उमेदवार सतीश नारकर यांच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केलीय. घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये ही घटना घडलीय.
उद्धव ठाकरेंची आज शक्तिशाली महाराष्ट्रासाठी घोषणा?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शक्तिशाली महाराष्ट्रासाठी एक महत्वाची घोषणा करणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना-मनसे यांच्यात युती होणार का? की भाजप सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार का? की आणखी काही, याची चर्चा सुरु झालेय.
वरळीत दोन ट्रक फ्राय पॅन जप्त, सचिन अहिर यांच्यावर आरोप
वरळी कोळीवाड्यात सुधाकर घागरे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत दोन ट्रक भरुन फ्राय पॅन जप्त करण्यात आलेत. यावेळी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नी संगीता अहिर उपस्थित होत्या असा आरोप होत आहे.
प्रचार संपायच्या एक दिवस राज्यभर पैशाचा पाऊस
प्रचार संपायला एक दिवस शिल्लक असताना राज्यभर पैशाचा पाऊस पडलाय. शिरुरमध्ये पाच लाख, नाशिकमध्ये १२ लाख तर रामटेकमध्ये १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
ओपिनियन पोल : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची पसंती
विविध ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पंसती दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत. मात्र, यामध्ये उद्धव यांनाच मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळाली आहे. तर झी २४ तासच्या महामुख्यमंत्री कोण? यामध्ये ३७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
माता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री - राज ठाकरे
मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आज राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी, 'त्यांनी बलात्कार करायचा होता तर निवडणुकीनंतर करायचा...' या वक्तव्यावरून त्यांनी आर आर पाटलांचा चांगलाच समाचार घेतला... तसंच, बलात्काराचा आरोप असणारे मनसेचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार सुधाकर खाडे यांची पाठराखण राज ठाकरेंनी यावेळी केली.
आदित्यने राज ठाकरेंचा दावा ठरवला खोटा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजकीय कारणासाठी कधीच फोन केला नाही, त्यांनी फक्त प्रकृतीच्या कारणासाठी त्यांनी राज ठाकरे यांना फोन केला असल्याचा दावा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा व्हिडिओ
शिवसेनेच्या आजपासून विविध चॅनल्सवर झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ टाकून शिवसैनिकांना आणि मराठी माणसांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
निवडणुकीचा अचूक अंदाज सांगा, २१ लाख घेऊ जा!
ज्योतिषांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कंबर कसली आहे. ज्योतिषांना आव्हान देत विधानसभा निवडणुकीचा अचूक अंदाज वर्तवल्यास, 21 लाख रुपयांचं बक्षिस देऊ, अशी घोषणा अंनिसने केली आहे.
बलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. पण, आबांनी मात्र नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या वक्तव्यावरून माघार घेतलीय.
निवडणुकीनंतर बलात्कार केला असता – आर. आर. पाटील
मनसेच्या उमेदवारांला आमदार व्हायचे आहे, पण त्याला बलात्कार करायचा होता, तर निवडणुकीनंतर करायला हवा होता, अशी धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी केली आहे.
हे केवळ अंदाज, शेवटचा निर्णय तुमचाच!
मतदानाला बोटांवर मोजण्याइतकेच दिवस आता बाकी राहिलेत... सोमवारी, सायंकाळी निवडणुक प्रचारांची रणधुमाळीही शांत होईल... पण, याआधी विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत.