‘पेड न्यूज’साठी... पुणे सर्वात पुढे!
यंदाच्या निवडणुकीत सगळीकडेच लक्ष्मीदर्शनाची चर्चा सुरु आहे. यातच, पेड न्यूजचाही प्रकार सर्रास दिसून येतोय. ‘पेड न्यूज’च्या बाबतीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतलीय ती पुणे जिल्ह्यानं...
UPDATE : मतदानासाठी उरले अवघे काही तास, पडद्यामागच्या घडामोडींना वेग
राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. यंदा महायुती आणि आघाडीमध्ये उभी फूट पडल्यामुळे पंचरंगी लढत प्रथमच रंगणार आहे.
युती तोडा ही अमित शहांची सूचना : रूडी
शिवसेना भाजपची पंचवीस वर्ष जुनी युती अशी अचानक कशी तुटली हा प्रश्न राज्यातील प्रत्येक माणसाला सतावत असतांना, शिवसेनेशी असलेली २५ वर्षांची युती तोडण्याची सूचना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच केली होती. त्यानुसार आम्ही युती तोडणारच होतो, असा गौप्यस्फोट पक्षाचे राज्याचे प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी केला आहे.
राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस
परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
मतदानासाठी हे ओळखपत्र असेल तरी चालेल हो!!
तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगानं निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.
प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी
युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती.
राज्यात जप्त केलेली रोकड १४ कोटीच्या पुढे
राज्यात मतं विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे, यात कोणत्याही एका पक्षावर आरोप करता येणार नाहीत.
एसटी बसमधून ४० लाखांची रोकड पकडली
मतदानाचा दिवस आणखी जवळ आल्याने पैसे पकडण्याच्या घटना आणखी वाढल्या आहेत. एसटी बसमधून निघालेल्या दोन प्रवाशांकडून ४० लाख रुपयांची रोकड सोमवारी दुपारी पोलीसांनी पकडली.
मनसे पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही – राज
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली. राष्टीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विधानसभा निवडणूक त्यांनी लढवू नये असं मतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
खडसे युतीचे मारेकरी, त्यांच्या डोक्यात मस्ती गेली – उद्धव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मुक्ताईनगरमध्ये भाजप नेते एकनाथ खडसेंबर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा भाजप नेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे.
... ही मुलगीही वडिलांच्या प्रचारासाठी उतरलीय मैदानात!
अंकिता पाटील पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांची कुटुंबीयही प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसले... इंदापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही त्यांचं सगळं कुटुंबच प्रचार करताना दिसलं.
काँग्रेसला पडलाय आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी
स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला.
उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणखी मजबूत केली : पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपेल, असे चित्र उभे केले गेले. मात्र अशाही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मेहनत घेऊन शिवसेना मजबूत केली.
निवडणूक : ११,०६,७२,६४० रुपये आणि दारू-गांजा जप्त
निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना राज्यात पैसे आणि दारुचा महापूर आलाय. आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत ११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये जप्त केलेत. तसंच अनेक ठिकाणी अवैध दारू आणि गांजाही पकडला गेलाय.
मोदींच्या 'त्या' भाषणाचा 'पेड न्यूज' म्हणून वापर, काँग्रेसची तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये केलेलं भाषण अनेक कारणांमुळे चर्चेत राहीलं...
आचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...
एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत.
आज होणार प्रचाराचा शेवट, नेत्यांना शेवटची संधी
अत्यंत चुरशीनं लढवली जात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत.
ओपिनियन पोल: विधानसभा निवडणुकीत भाजप सेंच्युरी ठोकणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सेन्चुरी ठोकणार आहे. भाजपला सर्वाधिक म्हणजे ११० जागा मिळतील, असा अंदाज 'झी 24 तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
मोदींच्या सभेला गुजरामधून माणसं आणली - उद्धव ठाकरे
उद्धव यांच्या भाषणात मोदी आणि भाजपच मुख्य लक्ष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी मोदींच्या बोरिवलीतील सभेला गुजरातमधून बसेस भरभरून माणसे आणली गेल्याचा आरोप केला. आजपर्यंत आमचं प्रेम अनुभवलंत आता शिवसेनेच्या अंगाराची धग सोसा, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला.
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवाला किमान ५० योजना पूर्ण करणार - उद्धव
शिवसेनेचा २०१६ मध्ये सुवर्णमहोत्सव आहे. या महोत्सव विशेष करण्यासाठी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असले आणि तोपर्यंत राज्यातील किमान ५० योजना शिवसेनेच्या सरकरानं पूर्ण केलेल्या असतील, अशी घोषणा आज उद्धव ठाकरेंनी केली.