मनसे पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही – राज

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली. राष्टीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विधानसभा निवडणूक त्यांनी लढवू नये असं मतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं. 

Updated: Oct 13, 2014, 06:42 PM IST
मनसे पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही – राज  title=

मुंबई: राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली. राष्टीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विधानसभा निवडणूक त्यांनी लढवू नये असं मतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं. 

नरेंद्र मोदींनाही राज ठाकरेंनी पुन्हा टीकेचं लक्ष्य केलंय. स्वत:च्या राज्याच्या प्रेमात पडू नका, पंतप्रधान मोदींना दिला मोदींनी सल्ला दिलाय. मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होऊन इतके दिवस झाले असले तरी, अजून गुजरातचे मुख्यमंत्री असल्याचंच वाटतं, असंही राज ठाकरे म्हणाले. 

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही त्यांनी टीका केलीय. गुजरातच्या आनंदीबेन यांच्या वक्तव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे किंवा नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. राज्यात कोणत्याही स्थानिक पक्षांचं राज्य असलं तरी केंद्र सरकारला त्यांची कामं करावीच लागणार असंही राज ठाकरे म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.