मुंबई : १९ ऑक्टोबर २०१४ ला सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आघाड्या आणि युतीच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय... आणि आता त्याला हवा दिलीय राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी...
महाराष्ट्रात सरकार स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. ट्टिवटरवर त्यांनी आपली ही प्रतिक्रिया नोंदवलीय. निवडणुकांबरोबरच प्रफुल्ल पटेल सध्या ‘इंडियन सुपर लीग’च्या मध्येही बरेच व्यस्त दिसत आहेत.
त्यामुळं या चर्चेला आणखीनच जोर चढला आहे. पटेलांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? एका पक्षाचं पूर्ण बहूमत आलं नाही तर राज्यात नवं राजकीय समीकरण उदयाला येणार की काय? अशीही चर्चा आता रंगू लागलीय.
#NCP will have a crucial role to play in #Maharashtra Govt. Formation. I am confident that NCP will do well in the polls. #VoteForNCP
— Praful Patel (@praful_patel) October 16, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.