मुंबई : शिवसेनेने आपलं मुखपत्र सामनामध्ये म्हटलंय, राज्याच्या भल्यासाठी भाजपाने ठरवलेल्या व्यक्तीला आपण मुख्यमंत्री म्हणून साथ देण्यास तयार आहोत.
मुख्यमंत्रीपदी नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे यांच्यापैकी कुणाचं नाव ठरवायचं याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील असंही सामनाने म्हटलंय.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेकांची नावं घेतली जात असली, तरी नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी मुख्यमंत्रीपदासाठी एकाची वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.