शिवसेनेचा मुख्यमंत्री करूनच दाखवेन - उद्धव ठाकरे

युतीच्या घटस्फोटानंतर महालक्ष्मी रेसकोर्सवर आज शिवसेनेची पहिलीच जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंसोबत  युवासेना नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते

Updated: Sep 27, 2014, 09:17 PM IST
शिवसेनेचा मुख्यमंत्री करूनच दाखवेन - उद्धव ठाकरे title=

मुंबई : युतीच्या घटस्फोटानंतर महालक्ष्मी रेसकोर्सवर आज शिवसेनेची पहिलीच जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंसोबत  युवासेना नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते.  या सभेसाठी शिवसैनिकांनी केलेली गर्दी नक्कीच लक्षवेधक ठरली. 'परक्यांसाठी मित्राच्या पाठित वार केला' असं म्हणत भाजपनं आपल्या स्वार्थासाठी युती तोडली, असं या सभेत उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

 

पाहुयात काय काय म्हणालेत उद्धव ठाकरे या सभेत.... 

* मी कधीही म्हटलं नव्हतं की ती मोदींची लाट नव्हतीच... फक्त ती लाट वेगळी होती... आत्ताची परिस्थिती वेगळी आहे

* मेरे पास विश्वास हैं, भरोसा है... मित्राच्या पाठीत कधीच वार करणार नाही  

* रामदास आठवलेंना जाहीर आवाहन करतो... या बाळासाहेबांचा आणि बाबासाहेबांचा महाराष्ट्र आपण घडवूया... उपमुख्यमंत्री पद देतो... सगळं देतो...

* हे आव्हान मी स्वीकारलंय ते तुमच्यामुळेच आणि तुमच्यासाठीच

* लढायचं तर मर्दासारखं लढू आपण... 

* कामं करण्यासाठी अनुभव नाही इच्छा लागते

* पाकव्याप्त, चीनव्याप्त जागा घ्या... कर्नाटकनं बळकावलेली महाराष्ट्राची जागा घ्या... विधानसभेच्याच काय लोकसभेच्याही सगळ्या जागा देतो... 

* सत्ता आल्यास पोलिसांना घरं देणार

* सोन्यासारखं ताट वाढवून दिलं होतं.. पण, तुम्ही कर्मदरिद्री आहात

* खुर्चीचा वेडा, पागल मी नाही... पण आव्हान देणार असाल तर ते आव्हान पेलून दाखवणारच स्वीकारणार... शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवणारच

* मुख्यमंत्री म्हणतात, उद्धव ठाकरेंना अनुभव नाही... पण, मी म्हणेन सगळ्या गोष्टींत अनुभव विचारायचा नसतो... एवढा अनुभव होता तर फायली का नाही हलल्या... तेव्हा तुमचा अनुभव कुठे गेला...

* ते म्हणतात, उद्धव ठाकरेनं मुख्यमंत्रीपदासाठी युती तोडली... होय तोडली... पण, तुम्ही ज्या जागा वाढवून मागत होतात... त्या काय लगोऱ्या खेळण्यासाठी?


सभेसाठी प्रचंड गर्दी

* एवढी साथ दिल्यानंतर तुम्ही आम्हाला लाथ मारणार असाल तर छत्रपतींचा आशीर्वाद कुणाच्या मागे हे तुम्हाला दाखवतो

* तुम्ही हिंदुत्वाशी नातं तोडलंय... महाराष्ट्रातला हिंदू अजिबात माफ करणार नाही

* पण, 30-35 जागा सोडणं हे कोणत्याही पक्षाला शक्य नाही

* उद्धव ठाकरेनं युती तोडलेली नाही... मी शेवटपर्यंत युती टिकवण्यासाठी प्रयत्न केले

* पंकजाशी लढणार नाही, प्रीतमशी लढणार नाही... बहिणीशी लढाई करणार नाही - उद्धव ठाकरे

* सगळ्या जागांवर उमेदवार उभे आहेत... पंकजाविरुद्ध उमेदवार दिलेला नाही

* पंकजा कधीही हाक मार, तुझा भाऊ तुझ्या पाठिशी उभा राहील - उद्धव ठाकरे

* महाजन, मुंडे घराण्याशी कौटुंबिक संबंध होते, ते कायम राहणार 

* मी नाती जपणारा माणूस - उद्धव ठाकरे

* मनापासून सांगतो, युती तुटल्याचा आनंद मला झालेला नाही

* हिंदूंचा घंटानाद कसा असतो, हे आता तुम्हाला दाखवणार आहे

* तुम्ही मांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधली ती मांजर नाही, वाघ आहे... 

* मी त्यांना म्हटलं, सरळ सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची जबाबदारी तुमच्यावर सोपवलीय

* परवा, सायंकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला... म्हणाले, खूप वाईट वाटतंय... 

* मी म्हणेन, हे दुर्दैव नाही, तर महाराष्ट्राचं सुदैव आहे

* गेले 25 वर्ष खूप सहन केलं... अजूनही सहन करायची तयारी होती

* हा महाराष्ट्र कुणाचा हे माझा शिवसैनिक दाखवणार आहे

* आता, लाट कशाला म्हणतात ते शिवसैनिक दाखवेल

* आई जगदंबेला पाठिशी उभी राहा, महिषासुराचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे...

* एकदा होऊन जाऊ दे... कोण कोण सोबत आहे, ते कळू दे

* जमलेल्या माझ्या तमाम हिंदूंनो, मातांनो आणि भगिनींनो

 

* युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित

* युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडण्यासाठी मंचावर दाखल... 

* दिल्लीचा माज आम्हाला दाखवू नका - संजय राऊत

* मोदीसाहेब तुम्ही दिल्ली सांभाळा... महाराष्ट्र भगवाच सांभाळणार...

* युती का तुटली, कशी तुटली याबद्दल उद्धव ठाकरे बोलतीलच... 

* कालपर्यंत आमचं मिशन 150 होतं, आज मिशन 250 झालंय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.