मुंबई : विधानसभा निवडणुक 2014 च्या निकालात महाराष्ट्रात शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष म्हणून समोर आलाय. शिवसेनेनं 63 जागांवर विजय मिळवलाय. पण, तब्बल 123 जागांवर विजय मिळवून बहुमताच्या जवळच्या आकड्यापर्यंत (144) पोहचलेल्या भाजपला आता शिवसेना मदत करणार का? की ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रशासन पद्धतीवर खडे फोडत भाजपनं या निवडणुकीत विजय मिळवलाय, त्यांचा टेकू भाजपला सत्तास्थापनेसाठी घ्यावा लागणार? असा प्रश्न समोर आलाय. यावरच, उद्धव ठाकरेंनी सध्या आपण 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमिका घेतल्याचं म्हटलंय..
पाहुयात काय काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी...
* अखंड महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार - उद्धव ठाकरे
* आम्ही एकाकी लढलो... दादर जिंकल्याचा आनंद... मतदारांचे मानले आभार
* भाजपकडून प्रस्ताव आला तर त्याला उत्तर देणार
* बाळासाहेबांना ज्यांनी त्रास दिला, ते पडले... नारायण राणेंना टोला
* मला कुणी एकटं पाडू शकत नाही
* पाठिंब्याबाबत अजून कुणाचा निरोप नाही... मी प्रस्ताव घेऊन कसा जाणार? उद्धव ठाकरेंचा सवाल
* राष्ट्रवादीचं समर्थन मान्य असेल तर भाजपनं त्यांच्यासोबत जावं
* अजून कोण कुणाचं हे माहित नाही... सर्व पर्याय खुले आहेत... सध्या सर्व शक्यता आहेत
* राष्ट्रवादीचं समर्थन मान्य असेल तर भाजपनं त्यांच्यासोबत जावं
* सध्या माझी वेट अॅन्ड वॉचची भूमिका
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.