परभणी : शिवसेनेच्या एकेकाळच्या या बालेकिल्ल्यावर आता राष्ट्रवादीने कब्जा मिळवलाय. मात्र या मतदारसंघात जनता कुणाच्या बाजूने ऐनवेळी कौल देते हे सांगणं तसं कठीणच.
पूर्णपणे कृषीव्यवस्थेवरच समाजकारण असलेला हा वसमत विधानसभा मतदारसंघ. त्यामुळेच शेतीपुरक उद्योग, आणि त्यावर आधारीत कारखानदारी , सहकारी चळवळ आणि त्यावरच फिरणारे वसमतचं. माजी सहकार राज्यमंत्र्याचा जिल्हा अशीही या जिल्ह्याची ओळख करुन दिली जाते.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता २००४ प्रमाणे पुन्हा राष्ट्रवादीनेच बाजी मारली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयप्रकाश दांडेगावकर यांना ८३ हजार ३०० मत मिळाली होती. तर शिवसेनेच्या जयप्रकाश मुंदडा यांना ८० हजार १०० मत मिळाली होती.
दोन टर्म या मतदारसंघावर दावा मिळवणा-या राष्ट्रवादीच्या जयप्रकाश दांडेगावकर यांना ३२०० मताधिक्य मिळालं होतं.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना नऊ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. याच मतदारसंघातील वसमत नगरपालिका आणि पंचायत समितीही शिवसेनेच्या ताब्यात आहे.
या मतदारसंघात २ लाख ५६ हजार ६४९ एवढी मतदारसंघ्या असून १लाख ३६ हजार पुरुष तर १ लाख २० हजार ४५५ एवढे स्त्री मतदार आहेत.
हा मतदारसंघ केद्रात सत्ताधां-यांच्या विरुद्ध आणि राज्यात सत्ताधा-यांच्या बाजूने कौल देणारा मतदारसंघ आहे. विकासकामाच्या बळावर लोक आपल्याला पुन्हा संधी देतील असा विश्वास आहे.
आमदारांच्या म्हणण्यानुसार…
- धाराशिव साखर कारखान्याचे पुनरुजीवन
- टोकाई साखर कारखान्य़ाचे काम प्रगतीपथावर
- वसमत येथे प्रस्तावित ग्लोबल टेक्सटाईल पार्क
- वसमत पाणीपुरवठा लवकरच
- महिला रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर
- वातानुकुलीत नाट्यगृह
- सिंचनाच्या कामाना अग्रक्रम
- अशी विकासकाम झाल्याचा दावा करण्यात येतोय.
- तर मतदारसंघातील अनेक समस्या कायम असल्याचे चित्र दिसतय.
- सिद्धेश्वर उपसा सिंचन योजना प्रलंबित,
- लोहरा सिंचन योजना अपूर्ण,
- पूर्णा नदीवरील बंधारे अपूर्ण,
- केळी निर्यात केंद्राचा फायदा मुठभरांनाच
- टेक्सटाईल पार्कपासून सर्वसामान्य बेरोजगार वंचित
- शहरात अतिक्रमणाची समस्या
नागरिकांनी विद्यमान आमदारांच्या कामावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात. या मतदारसंघातून विद्यमान आमदारांनी केवळ आश्वासनं दिलीत असा आरोप करण्यात येतोय. शिवसेनेच्या गोटातून डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्यासह शिवाजीराव जाधव यांनीही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. दोघांनीही पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्ष लढवून दांडेगावकरांना हरवणारच असा चंग बांधलाय.
लोकसभा निव़डणुकीत कॉंग्रेस आघाडी राष्ट्रवादीत धुसफुस तर महायुतीतही सैन्य सरदारात विभागलं गेलंय. एकुण सगळीकडेच सुंदोपसुंदी माजली.
महायुती आणि आघाडी या दोन्ही पक्षांनी मतदारांपेक्षा स्वताच्या कार्यकर्त्यानाच एकदिलानं राहायला शिकवावं असा सल्ला वसमतचे नागरीक देतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.