पुणे : गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कित्येक जणांना तर रेल्वेची तिकिटेही मिळत नाहीत.
प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वेमार्फत कोकण मार्गावर अजून ११४ खास गाड्यांची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी पुण्यात केली.
थोड्या दिवसांपूर्वी रेल्वेने ६० खास गाड्या कोकण मार्गावर सोडण्याची घोषणा केली होती. पण प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने केला आहे.
या शिवाय पहिल्यांदाचं महाराष्ट्र सरकारने रेल्वेमार्ग उभारण्यासाठी नवीन कंपनी स्थापन केली आहे. यासाठी राज्य सरकारने गुंतवणूकही करत आहेत.
राज्य सरकारने नवीन रेल्वेमार्ग उभारण्यासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वे जोडण्याचा प्रस्ताव यात आहे. त्यासाठी कराड ते चिपळूण तसेच कोल्हापूर ते वैभववाडी, असा नवा रेल्वेमार्ग सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुण्यात असताना दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.