तपोवन एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली

मनमाड मुंबई दरम्यान धावणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना होता होता टळली.

Updated: Apr 11, 2017, 09:02 PM IST
तपोवन एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली title=

मनमाड : मनमाड मुंबई दरम्यान धावणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना होता होता टळली. मनमाडपासून काही अंतरावर धावत्या तपोवन एक्स्प्रेसनं काही डबे मागेच सोडले.

एक्स्प्रेसचे केवळ तीन डबे घेऊन इंजिन पुढं धावू लागले. काही काळ प्रवाशांना काय झालं ते कळलंच नाही. मात्र त्यानंतर प्रवासी कमालीचे घाबरले आणि आरडाओरडा सुरू केला.