भाजपकडून उमेदवारी भरलेले अनंत तरे पुन्हा शिवसेनेत

शिवसेनेच विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून भाजपचा आसरा घेत उमेदवारी अर्ज भरला. मात्र, त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.

Updated: Sep 30, 2014, 07:36 AM IST
भाजपकडून उमेदवारी भरलेले अनंत तरे पुन्हा शिवसेनेत title=

ठाणे : शिवसेनेच विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून भाजपचा आसरा घेत उमेदवारी अर्ज भरला. मात्र, त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.

अनंत तरे यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र काल त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

आपण शिवसेनेतच असून शेवटच्या श्‍वासापर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही, अशी ग्वाही उपनेते अनंत तरे यांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण झटू असेही त्यांनी सांगितले.  

ठाण्यातील शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आपण संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू असे तरे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. संपूर्ण कोळी समाज प्रचारात सहभागी होईल असेही त्यांनी नमूद केले. अनंत तरे यांनी कोपरी-पाचपाखाडीमधून भाजपकडून अर्ज भरला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.