जळगाव : एकीकडे महिला आणि बालकल्याण विभाग खात्याची २०६ कोटींच्या साहित्य खरेदी वादात सापडली असतानाच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा इथल्या अंगणवाडीत बालकांना आहारात दिल्या जाणार्या राजगिरा चिक्कीत कटर ब्लेड निघाल्याने खळबळ उडालीय.
तर दुसरीकडे जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे मुलांना वाटप करण्यात आलेल्या चिक्कीत बारीक खडे निघालेय तसेच सूर्यकांत राजगिरा चिक्की असं लिहलेल्या चिक्कीच्या पाकिटांवर उत्पादनाबाबत कोणतीच माहिती नमूद करण्यात आलेली नाही. यामुळे पालकांचा संताप होतोय.
धानोरा येथे अंगणवाडीचे पाच वर्ग आहे. त्यात ६० ते ७० विद्यार्थी आहेत. अंगणवाडीत बालकांना पोषण आहार दिला जातो. सकाळी हा आहार वाटप केला. त्यात वर्गातील ऋतिका भगवान धनगर (दीड वर्ष) या बालिकेला मिळालेल्या राजगिर्याच्या पाकिटात तीन इंचाचे ब्लेड कटर निघाल्याने ती रडू लागल्याने तिच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला.
मिळालेले पाकीट निकृष्ट दर्जाचे असून खातांना बारीक दगडी कच लागते. याबाबत पालकांनी तक्रार करूनही त्याचे वाटप त्यांनी सुरू ठेवले. ब्लेड कटर निघालेल्या पाकिटाचा पंचनामा अंगणवाडी निरीक्षकानी केला. धानोरा परिसरातील अंगणवाडीमध्ये चिक्की पाकीट वाटप बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.