अमरावती : प्रहार संघटनेतर्फे आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते गुजरातमधील पंतप्रधानांच्या वडनगर येथील घरापर्यंत ही यात्रा असेल.
नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानापासून ही यात्रा सुरु होईल. २१ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात येथील वडनगर या गावी पोहोचणार आहे. वर्धा, वाशीम, बीड, सातारा, सांगली, नगर, धुळे या मार्गाने २१ एप्रिलला ती पंतप्रधानांचे गाव वडनगर येथे पोहोचणार आहे.
रघुनाथदादा पाटील, आमदार बच्चू कडू या यात्रेचे नेतृत्त्व करणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा, घटनेला जोडलेले परिशिष्ट नऊ रद्द करून शेतकरी, शेतमजुरांचे शोषण थांबवावे, शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार कर्ज देण्यात यावे तसच शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे या मागण्या करण्यात येणार आहेत.