सहकार निवडणुकीत पंकजा ताईंची बाजी, धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा

मराठवाड्यातील अग्रगण्य अशा वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत, मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवलाय. दहा हजारा मतांनी विजय मिळवलाय. 

Updated: Jun 22, 2016, 09:30 AM IST
सहकार निवडणुकीत पंकजा ताईंची बाजी, धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा  title=

बीड : मराठवाड्यातील अग्रगण्य अशा वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत, मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवलाय. दहा हजारा मतांनी विजय मिळवलाय. 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे याच्या पॅनेलमध्ये ही थेट निवडणूक झाली. एकंदर ४० हजार मतदारांपैकी २२ हजार मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. 

या निवडणुकीत धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा उडाला. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांना ५ ते ६ हजार मते मिळाली. सर्वाधिक मते खासदार प्रीतम मुंडे यांना मिळाली. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपला पराभव मान्य केला आहे.