शेतकऱ्यांच्या १०० टक्के समस्या सोडवणे अशक्य- गडकरी

बदलेल्या हवामानाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे.  मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचे मंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे.

Updated: Apr 19, 2015, 07:19 PM IST
शेतकऱ्यांच्या १०० टक्के समस्या सोडवणे अशक्य- गडकरी title=

नागपूर : बदलेल्या हवामानाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे.  मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचे मंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे.

'सरकारची शेतकऱ्यांच्या समस्या १०० टक्के सोडविण्याची ताकद नाही. सरकारमध्ये क्षमता नाही की सरकारकडे पैसादेखील नाही. यामुळे शेतकऱ्यांनाच काहीतरी करावे लागेल. आपले कर्तृत्व स्वत:लाच दाखवावे लागेल. सगळच फुकटात मिळणार नाही. सरकार मदत करेल, पण ती केवळ दोन टक्के', असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे सेंद्रीय शेती कार्यशाळेचे आयोजन केले होते, तेथे बोलतांना गडकरी यांनी हे वक्तव्य केले. 

पुढे गडकरी असेही  म्हणाले की, 'सरकारी योजनांवरदेखील पूर्ण अवलंबून राहू नका. राज्यसरकारची जलयुक्त शिवार योजना आपल्या गावात येईल, त्यावेळी आपणदेखील या योजनेसाठी स्वत: श्रमदान करण्याची गरज आहे. एक घमेले माती उचलली तरी ते मदत करण्यासारखे असेल. पण ते करावे लागेल. सध्याचा काळ हा धावणाऱ्या पाण्याला चालायला लावणं, चालणाऱ्या पाण्याला थांबवणं आणि थांबवलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला लावणारा आहे. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: काम सुरू करण्याची गरज आहे.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.